
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यासाठी राज्यपालांनी नियुक्ती केली होती. आता या पदावर दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दिलीप वळसे-पाटील विधानसभेचे हंगामी अध्यक्ष
हंगामी अध्यक्षपदासाठी नव्या सरकारने वळसे पाटील यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे केली होती. दरम्यान शनिवारी विश्वासदर्शक ठराव मांडला जाण्याची शक्यता आहे. त्यावेळी कोणती अडचण येऊ नये म्हणून सरकारने हा पवित्रा घेतल्याचे बोलले जाते. यापूर्वी दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेचे अध्यक्षपद सांभाळलेले आहे.
