स्टील पेक्षाही 15 पट मजबूत आहे हे खास जॅकेट

थंडीपासून वाचण्यासाठी आपण जाड जॅकेट घालत असतो. मात्र नेदरलँडच्या प्रसिद्ध फॅशन ब्रँड Vollebak ने असे जॅकेट लाँच केले आहे, जे ‘जगातील सर्वात मजबूत जॅकेट’ असल्याचे सांगितले जात आहे. हे जॅकेट 100 टक्के dyneema पासून बनविण्यात आले आहे. जे सर्वात मजबूत फायबर आहे. तुम्ही चाकूने हे जॅकेट फाडण्याचा प्रयत्न केला तरी देखील याला काहीही होणार नाही.

याआधी देखील कंपनीने असेच कपडे बनवलेले आहेत. याआधी कंपनीने 100 वर्ष चालणारी पँट बनवली होती. आता कंपनीने हे खास जॅकेट बनवले आहे. या जॅकेटचा बाहेरील भाग स्टील पेक्षाही 15 पट अधिक मजबूत असल्याचे सांगितले जात आहे. हे जॅकेट फाडले जाऊ शकत नाही.

(Source)

Vollebak ने आपल्या वेबसाइटवर जॅकेटविषयी लिहिले आहे की, आम्ही पफर जॅकेट निवडले, कारण क्लोदिंग रेंजमध्ये हे सर्वात मऊ असते. आम्ही याला जगातील सर्वात मजबूत फायबरपासून बनवले आहे. या जॅकेटचा बाहेरील भाग स्टील पेक्षाही 15 पट मजबूत आहे. म्हणजे तुम्ही स्टीलचे जॅकेट जर घातले तर हे त्यापेक्षा 15 पट अधिक मजबूत आहे.

(Source)

हे जॅकेट बनविण्यासाठी ज्या dyneema फायबरचा वापर करण्यात आला. ते खासकरून शरीरासाठी चिलखत बनवण्यासाठी वापरले जाते. एंटी बॅलिस्टिक गाड्यांमध्ये आणि विशाल कंटेनरमध्ये याचा वापर होतो.

या जॅकेटचे वजन 2.5 किलो असून, हे जॅकेट अनेकवर्ष टिकेल. या जॅकेटचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे याच्या बाहेरील बाजू जेवढी कडक आहे, तेवढीच आत ऊब मिळते. जॅकेटला 50 डिग्री सेल्सियसमध्ये देखील टेस्ट करण्यात आले आहे. मात्र आगीच्या संपर्कात आल्यावर या जॅकेटला आग लागते. बंदूकीची गोळी देखील जॅकेटला भेदू शकते. कंपनीने जॅकेटची किंमत 995 डॉलर (जवळपास 71.5 हजार रुपये) ठेवली आहे.

Leave a Comment