वडिलांनी उशी खाली ठेवलेल्या 10 हजारांमुळे बदलले रॅपर रफ्तारचे नशीब

दिलिन नायर, ज्याला तुम्ही रॅपर रफ्तार नावाने ओळखता. काही दिवसांपुर्वीच त्याने एक टॉक शोमध्ये आपल्या आयुष्यातील काही खास गोष्टी शेअर केल्या. तुम्ही कधी विचार केला आहे का, कोणी दिलिनला रफ्तार बनवले असेल ? कारण एक अशी वेळ होती जेव्हा रफ्तार एक रॅपर नाही, तर सॅल्समॅनची नोकरी करत होता. तेव्हाच त्या व्यक्तीने रफ्तारला म्हटले होते, ‘जा एकदा स्वतःचे नशीब आजमावून बघ.’

रॅपर बनण्याआधी रफ्तार यूसीबीमध्ये एक सेल्समॅनची नोकरी करत होता. तो सांगतो की, ‘माझा पगार 10 हजार रुपये होता. तर माझे वडिल महिन्याला 12 हजार रुपये कमवायचे. एक दिवस त्यांनी माझ्या उशी खाली 10,000 रुपये ठेवले आणि म्हणाले की, कामाला जाण्याची गरज नाही, हा घे तुझा पगार.’

रफ्तार पुढे सांगतो की, ‘त्या दिवशी मी ठरवले की, माझे वडिलांनी मला स्वातंत्र्य दिले आहे. माझ्याकडे कोणतेही कारण नाही की, मी सांगू शकेल माझ्या आई-वडिलांनी माझी स्वप्न पुर्ण करण्यासाठी साथ दिली नाही.’

रफ्तारचे वडिल त्याला म्हणाले होते, ‘जा स्वतःचे नशीब एकदा आजमावून बघ. काहीही नाही झाले, तर एखादे दुकान सुरू करू. उपाशी मरणार नाहीस तू, जिंवतच राहशील.’ रफ्तारच्या आई-वडिलांप्रमाणे प्रत्येकजण आपल्या मुलांची स्वप्न पुर्ण करण्यासाठी अशीच साथ देत राहिले तर अनेक रफ्तार निर्माण होतील.

 

Leave a Comment