श्रीलंकेतील या प्रातांचा राज्यपाल होणार फिरकीचा जादुगार !


कोलंबो – आपल्या नव्या इनिंगसाठी श्रीलंकेचा दिग्गज माजी खेळाडू आणि फिरकीचा जादुगार अशी ओळख असलेला मुथय्या मुरलीधरन सज्ज झाला असून श्रीलंकेच्या उत्तर प्रांताचे राज्यपाल म्हणून श्रीलंकेचे नवनियुक्त राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी मुरलीधरनची नियुक्ती केली आहे.

श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या नवीन सरकारने या महिन्याच्या सुरुवातीला नेमलेल्या तीन नवीन राज्यपालांमध्ये मुरलीधरनचा समावेश आहे. एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार, मुरलीधरनला उत्तर प्रांताचे राज्यपालपद स्वीकारण्याचे निमंत्रण राष्ट्रपती राजपक्षे यांनी दिले.

उत्तर प्रांतातील राज्यपाल म्हणून मुरलीधरनची तर, पूर्व प्रांताचे राज्यपाल म्हणून अनुराधा यामपाथ यांना नियुक्त केले जाईल. उत्तर मध्य प्रांताचे राज्यपाल म्हणून तिसा विठराना पदभार स्वीकारतील. अनुराधा यामपाठ या राष्ट्रवादी उद्योजक संघटनेच्या अध्यक्षा आणि प्रतिष्ठित वस्त्र निर्यात कंपनीच्या संचालिका आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याची करामत मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने ८०० बळी घेतले आहेत. मुरलीधरनने २०१० मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

Leave a Comment