एक विवाह असाही, वर-वधूपासून वरातीत आलेले पाहुणे देखील दृष्टीहीन

छत्तीसगडमधील एक विवाह सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. वर व वधू दोघेही दृष्टीहीन आहेत. दोघांची जात देखील वेगळी आहे. मध्य प्रदेशमधील ग्वालियवरून छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यात वरात आली. लग्नामध्ये आलेले वरातीत आलेले पाहुणे देखील दृष्टीहीन होते. त्यामुळे या खास लग्नाची चर्चा सुरू आहे.

छत्तीसगडमधील डूमरिया गावाच्या लोकांसाठी हे लग्न बघणे एक खास अनूभव होता. त्यामुळे ते निमंत्रण नसताना देखील संपुर्ण गाव राम पनिका यांचे घरी पोहचले. राम पनिका यांची मोठी मुलगी गूंजा हीचे लग्न होते. लहानपणापासूनच गूंजा बघू शकत नाही. अभ्यासात हुशार असल्याने तिने ब्रेल लिपीमधून बीएडचे शिक्षण देखील पुर्ण केले. शिक्षण घेत असतानाच तिची ओळख ग्वालियरच्या सूरजशी झाली. सूरज देखील पाहू शकत नाही. तो संगीत कलेत आयटीआय करत आहे. दृष्टीहीन युवक आणि युवतीची ओळख युनिवर्सिटीत संगीताचे शिक्षण घेताना झाली, तेथेच त्यांना प्रेम झाले.

दोन्ही कुटूंबानी त्यांचे प्रेम स्विकारात लग्न करण्यास होकार दिला. वरातीत माधव अंध आश्रमात संगीत शिकणारे 20 पेक्षा अधिक दृष्टीहीन उपस्थित होते. सूरज स्वतः या आश्रमात संगीत शिकवतो. अनेक नेते मंडळीं देखील या नवविवाहित जोडप्याला आशिर्वाद देण्यासाठी आले होते.

Leave a Comment