…म्हणून नासाच्या अंतराळवीरांना वापरावे लागत आहे डायपर

आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनचे (आयएसएस) कोणतेही शौचालय काम करत नसल्याची माहिती नासाने दिली आहे. यामुळे अंतराळवीरांना डायपरचा वापर करावा लागत आहे. आयएसएसचे कमांडर लूसा परमिटानो यांच्यानुसार, अमेरिकेच्या भागातील शौचालय वारंवार खराब झाल्याचे सिग्नल देत आहे. रशियाच्या भागात लागलेले शौचालय पुर्ण क्षमतेने भरले आहे.

आयएसएसचमध्ये रशियात तयार झालेले दोन शौचालय बसविण्यात आलेले आहे. एक शौचालय अमेरिकेच्या भागात तर दुसरे रशियाच्या भागात आहे. याशिवाय स्टेशनशी जोडलेले सोयूज अंतराळ यानात देखील शौचालय आहे. मात्र याचा वापर अंतराळ यान उड्डाण घेत असताना केला जातो. स्थिर असताना याचा वापर कधीतरीच केला जातो.

सध्या अंतराळात दोन स्पेस स्टेशन कार्यरत आहेत. यातील ‘आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन’ हे अमेरिका, रशिया, यूरोपिय संघ, कॅनडा आणि जापान यांच्या सहयोगाने चालवले जाते. दुसरे स्पेस स्टेशन हे चीनचे आहे. ज्याचे नाव ‘तिआनगोंग-2’ असे आहे.

Leave a Comment