… म्हणून रिक्षाचालकाला गाडी भेट देणार आनंद महिंद्रा

देशातील टॉपची ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा अँन्ड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे ट्विटरवरील सक्रियतेसाठी ओळखले जातात. याचबरोबर ते आणखी एका गोष्टीसाठी ओळखले जातात ते म्हणजे उदारपणासाठी. ते नेहमी गरजूंची मदत करत असतात. यावेळी त्यांनी एका रिक्षावाल्यासाठी स्वतःचे मन मोठे केले आहे. आनंद महिंद्रा एका रिक्षावाल्यावर एवढे प्रभावित झाले की, त्यांनी त्याला गाडी देणार असल्याची घोषणा केली.

आनंद महिंद्रा यांनी नीरज प्रताप सिंह नावाच्या एका ट्विटर युजर्सचे ट्विट शेअर करत उत्तर दिले आहे. या ट्विटर युजरने एका रिक्षाचालकाचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये दिसत आहे की, रिक्षाच्या मागील बाजूस महिंद्राच्या गाड्यांवर येणारा कंपनीचा लोगो आहे. फोटो शेअर करणाऱ्या व्यक्तीने यावर त्यांची प्रतिक्रिया मागितली.

युजरच्या ट्विटरवर प्रतिक्रिया देताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, नीरज कदाचित तुला हे मजेदार वाटत असेल आणि ते आहे देखील. खासकरून तेव्हा, जेव्हा लोगो उलटा लावला आहे. पण मला खूप आनंदी वाटत आहे. कारण, एक रिक्षाचालक आमच्या ब्रँडकडे एक महत्वकांक्षा म्हणून पाहत आहे. म्हणूनच आम्ही त्यांना एक अपग्रेडेट वाहन देणार आहोत, जेणेकरून ते आयुष्यात प्रगती करू शकतील.

आनंद महिंद्रा यांचे हे ट्विट व्हायरल होत असून, युजर्स त्यांचे कौतूक करत आहेत.

आनंद महिंद्रा यांची महिंद्रा राइज नावाची कंपनी आहे. ही फ्रेंच कंपनी आधी Peugeot Motorcycles नावाने ओळखली जात असे. आनंद महिंद्रा यांनी ही कंपनी खरेदी केली आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या ट्विटमध्ये राइज या शब्दाचा उल्लेख केला. याआधी देखील आनंद महिंद्रा यांनी अनेक जणांनी गाडी गिफ्ट केली आहे.

Leave a Comment