मी नाराज नव्हतो, नाही आणि यापुढेही नसेन


मुंबई – पाच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार टिकणार याबद्दल माझ्या मनात काडीमात्र शंका नसल्याचे राष्ट्रवादीचे नेत अजित पवार यांनी म्हटले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष आणि त्यांनी स्थापन केलेल्या महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकणार यात माझ्या मनात मुळीच शंका नाही. तुम्ही म्हणत असाल तर असे मी स्टँपपेपरवरही लिहून देण्यास तयार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

आज सकाळपासून अजित पवार नॉट रिचेबल असल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली होती. मात्र त्यांनी प्रसारमाध्यमांना सामोरे जात आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर आज माझी बहिण सुप्रियासोबत मी शपथविधीसाठी जाणार आहे. माझ्या मनात कोणतीही नाराजी नाही मी तुम्हाला नाराज दिसतो का? असाही सवालही अजित पवार यांनी विचारला.

Leave a Comment