आजारी पडल्यावर विद्यार्थ्यांच्या जागी चक्क शाळेत जाणार रोबॉट

येणाऱ्या काळात विद्यार्थी आजारी पडल्यास त्यांच्या जागी रोबॉटला वर्गात शिकण्यासाठी पाठवले जाईल. या तंत्रज्ञानावर वैज्ञानिक काम करत आहेत. विद्यार्थ्यांच्या जागी रोबॉट शाळेत जाईल व विद्यार्थी हॉस्पिटल अथवा घरून टॅबलेटच्या मदतीने त्याला कंट्रोल करू शकतील. रोबॉट कॅमेऱ्याच्या मदतीने वर्गातील सर्व गोष्टी विद्यार्थ्याला लाईव्ह दाखवेल. ते नोट देखील तयार करतील. सध्या याचा पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे. प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास देशभरात याला लागू करण्यात येईल.

या पायलट प्रोजेक्टची सुरूवात टोकियोतील तोमोबे हिगाशी स्पेशल सपोर्ट शाळेतून करण्यात आली आहे. रोबॉटचे नाव ऑरी आहे. विद्यार्थ्याच्या अनुपस्थितीमध्ये रोबॉटला बेंचवर ठेवले जाईल. त्याला दोन हात आहेत. कपळावर एक कॅमेरा आहे. त्याद्वारे क्लासमधील गोष्टी विद्यार्थ्यांना लाईव्ह शेअर करेल. याला टॅबलेटच्या मदतीने कंट्रोल करता येईल.

(Source)

या रोबॉटमध्ये स्पीकर देखील आहेत. ज्याच्या मदतीने विद्यार्थी घरूनच संवाद साधू शकेल. घरी बसल्या बसल्या रोबॉटला वेगवेगळ्या दिशेने फिरवता येते. वर्गात शिक्षकांच्या बोलण्यावरून रोबॉट इमोशन देखील शेअर करेल. जसे की, काही आवडले तरी टाळे वाजवणे, हाताने इशारे करणे आणि हाय-हॅलो करणे.

11 वर्षांची विद्यार्थीनी असाही नुसार, या रोबॉटचा वापर करणे आणि वेगवेगळ्या दिशने फिरताना पाहणे, खूपच मजेशीर आहे. असाही हॉस्पिटलमध्ये असताना याचा वापर केला.

(Source)

शाळेच्या मुख्यध्यापिका नोबारू ताची यांच्यानुसार, विद्यार्थी सहज ऑरीला कंट्रोल करू शकतात. हे त्यांच्यासाठी वर्गात येण्यासारखेच आहे. आम्ही ही सेवा पुर्णपणे लागू करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. हा रोबॉट तयार करणाऱ्या कंपनीचे सीईओ केंटरो योशीफुजी हे 10 आणि 14 वर्षांचे असताना आजारी पडल्यामुळे शाळेत जावू शकले नव्हते. म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना मदत करणारा रोबॉट तयार केला.

Leave a Comment