आपल्या निधनानंतर असे डिलीट होईल आपले गुगल अकाउंट?


आपण सध्या डिजीटल युगात वावरत असून सध्याच्या एका क्लिकवर घरबसल्या अनेक गोष्टी आपल्याला उपलब्ध होतात. त्यामध्ये आपल्या मदत होते, ती म्हणजे स्मार्टफोन आणि विविध अॅप्लिकेशन्सची… तसेच आज बाजारात उपलब्ध असलेल्या स्मार्टफोन जीमेल, गुगल मॅप सारखी गुगलच्या माध्यमातून चालणारी अनेक अॅप आधीच इंस्टॉल केलेली असतात. पण या जीमेल अकाउंटमुळे आपल्या बद्दलची बरीच माहिती गुगलच्या सर्व्हरवर साठवली जाते. पण आपल्यापैकी कोणी असा विचार केला आहे का ? आपल्या निधनानंतर आपल्या गुगल अकाऊंटचे काय होत असेल. तो करायची गरजच नाही कारण आता गुगलने तुमच्या निधनानंतर तुमचे जीमेल अकाउंट आपोआप डिलीट होण्याची सुविधा गुगलने उपलब्ध करून दिली आहे.

त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी myaccount.google.com या लिंक वर जावे लागेल. त्यानंतर Data & personalization या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर स्क्रोल डाऊन करून Make a plan for your account या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. या खाली असलेल्या Start ऑप्शनवर क्लिक करा. त्याचबरोबर तुमचे जीमेल अकाउंट डिलीट करण्यासाठी या ठिकाणी आणखी एक पर्याय दिसेल. ज्याद्वारे तुमचे अकाउंट किती काळ बंद राहिल्यानंतर कंपनी कडून ते डिलिट होणार हे तुम्हाला ठरवता येते.

स्टार्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इनअ‍ॅक्टिव्ह मॅनेजरचे पेज दिसेल ज्यात तुम्हाला 3 महिने, 6 महिने, 12 महिने, 18 महिने असे 4 पर्याय दिसतील. यातील कोणताही पर्याय तुम्ही तुमच्या सोयीनुसार निवडू शकता. यानंतर तुम्ही निवडलेल्या पर्यायानुसार तेवढा काळ तुम्ही ते बंद ठेवल्यास तुमचे अकाउंट कंपनी कडून डिलीट करण्यात येईल. पण तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा कालावधी संपत आल्यावर 1 महिना अगोदर मेसेज किंवा मेलद्वारे तुमच्याशी संपर्क साधण्यात येतो. त्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू केली जाते.

याशिवाय तुम्हाला याठिकाणी तुमच्या जवळच्या 10 व्यक्तींची नावे समाविष्ट करण्याचाही पर्याय उपलब्ध असल्यामुळे 10 व्यक्तींना तुमचे जीमेल अकाउंट डिलीट केल्याचे नोटिफिकेशन मिळेल. तसेच यात तुम्ही ऑटो रिप्लायचा पर्यायही निवडू शकता. ज्यामुळे तुम्हाला मेल करणाऱ्या व्यक्तीला आपोआप एक मेसेज जाईल की, तुम्ही हे अकाउंट वापरत नाही आहात. अशाप्रकारे तुमच्या मृत्यूनंतरही तुम्ही तुमचे अकाउंट डिलीट करू शकता.

Leave a Comment