या शिक्षकाच्या ‘पेन्सिल’ने बदलले शाळा आणि विद्यार्थ्यांचे नशीब

आयुष्यात प्रत्येक जण एका चांगल्या शिक्षकाच्या शोधात असतो. शिक्षकच असतात जे आपल्याला अनेक अडचणीत देखील हार न मानण्याचा सल्ला देतात व खडतर मार्गातून देखील रस्ता दाखवतात. कर्नाटकमधील असे एका शिक्षकांचे नाव आहे बी. कोटरेश. बी कोटरेश हे एका सरकारी शाळेत शिकवतात. मागील 6 वर्षात कोटरेश यांनी शाळेचा एवढा कायापालट केला आहे की, जे विद्यार्थी शाळा सोडण्यास तयार होते, ते देखील आनंदाने दररोज शाळेत येतात. ही सर्व कमाल त्यांनी एक पेन्सिलद्वारे केली आहे.

कर्नाटकातील बेलागुर्की गावात कोटरेश यांना सर्वजण ओळखतात. 38 वर्षीय कोटरेश यांनी जेव्हा येथील सरकारी शाळेत नोकरी स्विकारली तेव्हा येथील परिस्थिती खूपच खराब होती. जेवढे नवीन विद्यार्थी शाळेत येत होते, त्यापेक्षा अधिक सोडून जात होते. कोटरेश यांच्या लक्षात आले की, इंफ्रास्ट्रक्चर नसल्याने विद्यार्थ्यांचे शाळेत येण्यास मन होत नाही.

शाळेपासून ते गावातील लोकांमध्ये देखील उत्साह नव्हता. मात्र हळहळू कोटरेश यांनी करून दाखवले. आज शाळेत चांगले इंफ्रास्ट्रक्चर, शौचालय, पाण्याची सोय, स्पोर्ट्स रूम, लायब्रेरी आणि चार नवीन क्लासरूम आहेत. बी. कोटरेश या सर्व गोष्टींचे श्रेय त्यांच्या विद्यार्थ्यांना आणि पेन्सिलला देतात. पेन्सिल हे त्यांच्या शाळेचे मॅग्झिन आहे.

कोटरेश सांगतात की, मी बघितले की, शाळेत विद्यार्थी संख्या खूप कमी आहे. तसेच, मुलांना आर्ट आणि ड्राइंग यामध्ये आनंद येतो. म्हणून 2013 मध्ये शाळेत मॅग्झिनची सुरूवात केली. याचे मुख्य कारण मुलांचा सहभाग वाढावा हे होते. कोटरेश दर महिन्याला मॅग्झिनच्या 500 प्रती छापतात व गावात वाटतात. यासाठी दर महिन्याला 4 हजार रुपये खर्च येतो व हा खर्च कोटरेश स्वतः करतात.

(Source)

पेन्सिलमध्ये केवळ मुले आणि त्यांच्या क्रिएटिव्हीटीपर्यंत मर्यादित नाही. तर याला गावातील लोकांसाठी देखील डिझाईन करण्यात आलेले आहे. जेणेकरून, त्यांना देखील शाळेत काय चालते हे माहिती पडेल. मॅग्झिनचे दोन सेक्शन गावासाठी आहेत. यातील एक केलोना बननी (चला, विचारूया) आणि नामुरा परिचय (आपल्या गावाला ओळूखया) हे आहेत. यामध्या गावाबद्दल सांगितले जाते.

कोटरेश सांगतात की, मी विद्यार्थ्यांना आधी आजूबाजूच्या गोष्टींवर ध्यान देण्यास सांगतो. त्यानंतर त्यांना समजणे गरजेचे आहे की, काय होत आहे आणि का होत आहे ? मागील 6 वर्षात मुलांच्या विचारात आणि बोलण्यात खूप बदल झाला आहे. त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

पेन्सिलद्वारे पंचायतीमधील लोक शाळेतील समस्येविषयी वाचतात. त्यांना लक्षात येते की, त्यांना काय करायचे आहे. एक वेळ होती जेव्हा विद्यार्थ्यांना शाळेत यायचे नव्हते. मात्र आज विद्यार्थी अधिकाधिक वेळ शाळेत घालवतात.

Leave a Comment