सिंचन घोटाळ्याचे पुरावे आम्ही रद्दीत विकले – एकनाथ खडसे


मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मला, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे आणि इतर अशा काही जणांना हेतूपुरस्सर बाहेर ठेवण्यात आले. पक्षाला त्याच्यामुळे निश्चितच फटका बसला असल्याचे म्हणत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. तसेच आम्ही अजित पवार यांच्या विरोधातील बैलगाडीभर पुरावे रद्दीत विकले, अशी टीकाही खडसेंनी केली आहे.

त्याचबरोबर विधानसभा निवडणुकी दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे आणि मला सोबत घेऊन चालले असते, तर 20 ते 25 जागांचा फरक निश्चितच पडला असता, असाही दावा खडसे यांनी केला आहे. युती तोडण्याचा सामूहिक निर्णय 2014 मध्ये झाला होता. पण ते जाहीर करण्याची जबाबदारी विरोधी पक्षनेता म्हणून माझ्यावर होती. पण सेना-भाजप परत 6 महिन्यांनी चूक दुरुस्त करत सरकारमध्ये एकत्र आले. जनतेने 2019 मध्ये महायुतीला मतदान करत 161 आमदारांना निवडून देत सेना-भाजपला बहुमत दिले. पण दुर्दैवाने मुख्यमंत्रिपद कोणाला आणि किती वर्षे यावर एकमत न झाल्याने सेना-भाजप वेगळे झाल्याचे खडसेंनी सांगितले.

Leave a Comment