हे आहे जगातील सर्वात वयोवृद्ध जोडपे

अमेरिकेच्या टेक्सास येथे जगतील सर्वात वयस्कर, यशस्वी आणि आनंदी जोडपे 15 डिसेंबरला आपल्या लग्नाचा 80 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. जॉन हेंडरसन डिंसेबरमध्ये 107 वर्षांचे होतील, तर त्यांच्या पत्नीचे वय 105 वर्ष आहे.

गिनीज बुकमध्ये देखील त्यांच्या नावावर जगातील सर्वात वयोवृद्ध जीवित जोडपे हा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

जॉन यांना त्यांच्या दिर्घ आयुष्याचे रहस्य विचारल्यावर त्यांनी मस्करीमध्ये उत्तर दिले की, याचे कारण मुले न होणे हे आहे. दोघांना एकही बाळ नाही. जॉन यांनी सांगितले की, 1934 मध्ये ते टेक्सास युनिवर्सिटीमध्ये शिकत होते. त्यावेळी ते कॉलेजकडून फुटबॉल खेळत असे. तर शिक्षक बनण्यासाठी चार्लोट देखील त्याच कॉलेजमध्ये शिकत होत्या. त्या नेहमीच जॉन यांची मॅच बघायला येत असे.

कॉलेजमध्येच त्यांना प्रेम झाले व त्याचे रूपांतर लग्नात झाले. यशस्वी जीवनाचे रहस्य विचारल्यावर जॉन यांनी सांगितले की, आम्ही खेळ, फिरणे, व्यायाम या गोष्टी खूप करतो. मी आणि चार्लोट नेहमी सकारात्मक विचार करतो. प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो. कदाचीत हेच आमच्या वयाचे रहस्य असेल.

जॉन यांनी पुढे सांगितले की, 2010 मध्ये त्यांनी सर्वात वयस्क जीवित माजी यूटी फुटबॉलपटू हा पुरस्कार देखील मिळाला होता. एवढ्या वयात देखील ते युनिवर्सिटीचे फुटबॉल सामने बघायला जातात.

Leave a Comment