आलियासारखा दिसणार यूट्यूब स्टार सोशल मीडियावर व्हायरल


सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉलिवूड कलाकारांसारखेच दिसणारे बरेच जण समोर येत असतात. पण सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री आलिया भट्टसारखा दिसणाऱ्या एका मुलाचा चेहरा व्हायरल होत आहे. हुबेहुब आलियासारखा चेहरा असलेला फोटो यूट्यूब स्टार भूवन बाम याने शेअर केला आहे. बऱ्याच जणांनी हा फोटो पाहून त्याला ‘मेल आलिया’ असे संबोधले आहे.

अभिनेत्री आलिया भट्ट भूवन बामला देखील आवडत असल्याचेही त्याने म्हटले आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये तो अगदी आलियासारखाच हसताना दिसत आहे. त्याचा हा जूना फोटो आहे. पण त्याचा हा फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोणी तो आलियाचा भाऊ असल्याचे या फोटोवर म्हटले आहे. तर, कोणी दाढीमिशीवाली आलिया भट्ट, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Leave a Comment