एलियनचे अस्तित्व शोधण्यासाठी नासाने तयार केला खास रोव्हर

नासाने खोल समुद्रात चालणारा रोव्हर तयार केला आहे. याला गुरू ग्रहाचा चंद्र युरोपाच्या बर्फाच्या खाली एलियनच्या जीवनाशी निगडीत संशोधनासाठी तयार करण्यात आले आहे. दोन चाक आणि दोन कॅमेरे असणारा हा रोव्हर एकदा चार्ज केल्यानंतर अनेक महिने चालतो. याची चाचणी अंटार्टिका येथील ऑस्ट्रेलियाच्या केसी रिसर्च स्टेशन अंतर्गत करण्यात येत आहे. बर्फाळ समुद्राच्या खोल आत चालण्यासाठी यात नेव्हिगेशन सिस्टम देखील आहे.

यात बुओएंट रोव्हर फॉर अंडर आइस एक्सप्लोरेसन (ब्रुई) तंत्र लावण्यात आलेले आहे. ब्रुई याला पाण्याच्या आत योग्य स्थितीत ठेवते.

नासाचे वैज्ञानिक केव्हिन हँड यांच्यानुसार, बर्फाचे गोळे महासागराच्या खिडकीप्रमाणे काम करतात. बर्फ महासागराच्या आत जीवन कायम ठेवण्यास मदत करतो. पृथ्वीवर देखील बर्फ अशीच भूमिका बजावत आहे. आमच्यी टीमची विशेष रूची बर्फ आणि पाणी जेथे एकमेंकाना मिळतात तेथे काय होते हे जाणून घेण्यात आहे.

2025 मध्ये नासाचे ज्युपिटर मिशन आहे. यासाठी ते युरोपा क्लिपर लाँच करणार आहे. याचा उद्देश गुरू ग्रह आणि त्याचा चंद्र युरोपाची रिडिंग आणि फोटो घेणे हे आहे. या मिशनसाठी सर्वात मोठे यश हे ब्रुई डिव्हाईस हे आहे. हे डिव्हाईस पाणीचे तापमान, खारटपणा आणि ऑक्सिजन लेव्हल देखील मोजते. वैज्ञानिक या डिव्हाईसचा वापर दुसऱ्या ग्रहावर करणार आहेत.

 

Leave a Comment