एका आमदाराच्या वापसीमुळे ‘महाविकासआघाडी’चे संख्याबळ वाढले


मुंबई – काल सायंकाळी महाविकासआघाडीचा शक्तीप्रदर्शन आणि एकजुटीसाठी सांताक्रूझ येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये संविधान शपथ विधीचे आयोजन केले होते. आम्ही 162 अशी एकजुटीची ताकद त्यावेळी दाखवण्यात आली. पण ग्रँड हयात हाँटेलमध्ये काही वेळातच नाशिकच्या दिंडोरी मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवळ उपस्थित झाल्यामुळे महाविकासआघाडीचे संख्याबळ 163 एवढे झाले आहे.

कोणाच्याही संपर्कात नसलेल्या नरहरी झिरवळ यांना शिवसेना खासदार राजन विचारे आणि हेमंत गोडसे यांनी शोधून काढले आणि महाविकासआघाडीच्या शक्तीप्रदर्शनात त्यांना उपस्थित केले. गैरसमजुतीमुळे आपण गेलो होतो, असे परत आल्यावर नरहरी झिरवळ यांनी कॅमेऱ्यासमोर माफीही मागितली. आता फक्त राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हेच परत येण्याचे बाकी राहिलेले एकमेव आमदार आहेत.

Leave a Comment