भारतीय जेवणाला नाव ठेवणाऱ्याला नेटकऱ्यांनी झापले

भारतीय जेवण हे जगभरात प्रसिद्ध आहे. जगभरातील लोक भारतीय जेवणाचे कौतूक करत असतात. तुम्ही कोठेही सर्च केले तरी परदेशी व्यक्ती देखील आवडीने भारतीय पदार्थांचा आनंद घेताना दिसतात. आपल्या देशातील विविध प्रकारचे मसाले इतरत्र मिळणार नाहीत.

एका परदेशी व्यक्तीने मात्र भारतीय जेवणाला ‘अत्यंत वाईट’ असल्याचे म्हटले. मग काय, भारतीय युजर्सनी त्या परदेशी व्यक्तीला चांगलेच धारेवर धरले.

एका ट्विटर युजरने विवादास्पद जेवण कोणते याविषयी मत मागितले. यावर टॉम निकोल्स नावाच्या एका प्रोफेसरने ‘भारतीय जेवण खूपच वाईट असते, मात्र आपण त्याला चांगले दाखवण्याचा प्रयत्न करतो,’ असे उत्तर दिले.

प्रोफेसर टॉम निकोल्सच्या या ट्विटनंतर भारतीय युजर्सनी त्याला ट्विट करण्यास सुरूवात केली. एक युजर्सनी लिहिले की, त्यांच्याकडे टेस्ट बड्सच नाही. अनेक युजर्सनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.

ट्विटरवर ट्रोल झाल्यानंतर टॉम निकोल्सने आणखी एक ट्विट केले की, ‘मी भारतीय जेवण केवळ यूके आणि यूएसमधील रेस्टोरेंटमध्येच खाल्ले आहे.’

Leave a Comment