मुलीच्या जन्मानंतर 74 आठवड्यांनी वाढते पित्याचे आयुष्य


अद्यापही आपल्यातील अनेक समाजांमध्ये मुलीला दुय्यम दर्जाचे स्थान व वागणूक दिले जाते. कारण प्रत्येकालाच आपल्याला घरात कुलदीपक जन्माला यावे असे वाटत असते. पण ज्यांना मुली आहेत ते पालक खूपच धन्य आहेत. कारण मुलीच्या आगमनामुळे आई-वडिलाचे आयुष्य आनंदाने भरुन जाते. त्याचबरोबर मुलीच्या वडिलांच्या आयुष्यात 74 आठवड्यांची वाढ देखील होते. असे आम्ही नाही तर पोलंडच्या जेगिलोनियन युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे.

यूनिव्हर्सिटीच्या अभ्यासात असा दावा करण्यात आला केला गेला आहे की, मुलींचे पिता त्या लोकांच्या तुलनेत जास्त आयुष्य जगतात, ज्यांच्याकडे मुली नसतात. अभ्यासात कळाले की, मुलगा झाल्याचा तर पुरुषाच्या तब्येतीवर किंवा वयावर काहीही फरक पडत नाही, पण मुलगी झाल्यास पित्याचे आयुष्य 74 आठवड्यांनी वाढते. जेवढ्या पित्याला मुली जास्त असतील, तेवढेच जास्त आयुष्य ते जगतात.

मुलांच्या पित्याची तब्येत आणि वयावर होणार फरक जाणून घेण्यासाठी यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी 4310 लोकांचा डेटा घेतला. 2147 माता आणि 2163 पित्यांचा समावेश होता. संशोधकांचा दावा आहे, हा आपल्या पद्धतीचा पहिला असा शोध असून मुलांच्या जन्मानंतर आईच्या तब्येतीवर आणि वयावर पडत असलेल्या फरकाबाबाबत यापूर्वी अभ्यास केला गेला होता.

यूनिव्हर्सिटीच्या एका संशोधकानुसार, मुलींऐवजी मुलांना प्राथमिकता देणारे पिता आपल्या आयुष्याची काही वर्षे स्वतःच कमी करून घेतात. पित्यासाठी मुलीचा जन्म तर चांगली बातमी आहे. पण आईसाठी नाही कारण यापूर्वी अमेरिकन जर्नल ऑफ ह्यूमन बायोलॉजीच्या एका अभ्यासात असे म्हटले गेले होते की, मुलगा मुलगी दोघांच्याही जन्माचा आईच्या तब्येतीवर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे आईचे वय कमी होते.

Leave a Comment