अजित पवारांनी दिला उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा !


मुंबई – उपमुख्यमंत्री पदाचा अजित पवार यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. पण, यासंदर्भात भाजप किंवा राष्ट्रवादीकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी राष्ट्रवादीचे नेते आणि पवार कुटुंबियांकडून वारंवार चर्चा केली जात होती. त्यानंतरच आपल्या पदाचा त्यांनी राजीनामा दिला असे सांगितले जात आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या राजीनाम्याचे वृत्त समोर येत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. ते देखील यात राजीनामा देणार असल्याचे वृत्त आहे.

आज सकाळीच महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेवर सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारला 24 तासांचा कालावधी बहुमत सिद्ध करण्यासाठी दिला आहे. अशात बहुमत आपल्याकडेच असल्याचा दावा करणाऱ्या भाजपने बहुमत चाचणीच्या अवघ्या काही तासांपूर्वी माघार घेतली असे दिसून येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात.

Leave a Comment