अजित पवारांनी दाजींच्या मनधरणीनंतर दिला राजीनामा?


मुंबई – अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांचे जावई आणि सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांच्या मनधरणीनंतर दिला असल्याची चर्चा असून मंगळवारी सकाळी अजित पवारांची सदानंद सुळे यांनी हॉटेल ट्रायडंट येथे भेट घेतली होती. त्यांच्यामध्ये यावेळी नक्की काय चर्चा झाली हे कळू शकलेले नाही. पण अजित पवार यांची राजीनामा देण्यापूर्वी सदानंद सुळे यांच्याशी भेट झाल्यानंतरच हे पाऊल त्यांनी उचलल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, अजित पवारांना समजावण्याचा शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी देखील प्रयत्न केल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते अजित पवारांनी बंड केल्यानंतर त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत होते. पण, त्यांच्या या प्रयत्नांना यश येत नव्हते. छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील या महत्वाच्या नेत्यांचा यामध्ये समावेश होता. वरिष्ठ नेत्यांच्या प्रयत्नातूनही जेव्हा अजित पवारांना आवरता येत नाही हे लक्षात आल्यानंतर आज सकाळी पवार कुटुंबियांनी अजित पवारांची भेट घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. अखेर हाच प्रयत्न यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे.

Leave a Comment