30 महिलांनी तब्बल 20 लाख खिळ्यांनी कोरले द्वितीय विश्वयुद्धातील चित्र

मध्य प्रदेशच्या मंदसौर येथून 8 किमी लांब सोनगरीच्या मरियम वाजिद सिद्दिकी यांनी 20 लाख 44 हजार 446 खिळ्यांनी दुसऱ्या विश्वयुद्धातील चित्र कोरले आहे. हे चित्र 64 फूट लांब आणि 24 फूट रुंद आहे. यामध्ये माइल्ड स्टील नेल्सचा वापर करण्यात आलेला आहे.

तिने नेल आर्टमध्ये स्वतःच्याच पतीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तोडून नवीन विक्रम प्रस्तापित केला. मरियमने 3 प्रोफेशनल कलाकारांसोबत 30 महिलांच्या टीमने 10 महिने दररोज 10-10 तास काम करून हे चित्र तयार केले.

ही कलाकृती तयार करण्यासाठी 20 लाख खिळ्यांचा वापर करण्यात आला. कारण दुसऱ्या विश्वयुद्धात 20 लाखांपेक्षा अधिक सैनिक मारले गेले होते. कलाकृतीमध्ये 54 पॅनल आहेत. पीव्हीसी पॅनेल कोरियामधून खरेदी करण्यात आले, त्यांचे वय 50 वर्ष आहे. ही विशाल कलाकृती तयार करण्यासाठी बंगळुरू आणि मुंबईच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले. प्रत्येक खिळा 3.85 सेमी लांब आणि 0.3 ग्रॅम वजनाचा होता.

2012 मध्ये मरियमचे पती वाजिद खान यांनी सव्वा लाख खिळ्यांनी महात्मा गांधींचे चित्र तयार करून विक्रम केला होता. वाजिद हे वर्कशॉप देखील घेतात. येथे 500 महिला आहेत. यातील 30 महिलांची निवड चित्र बनविण्यासाठी करण्यात आली होती.

 

Leave a Comment