राळेगण सिद्धीवरून प्रेरणा घेत हा देश देत आहे जलसंकटाला मात

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचे गाव राळेगण सिद्धी वैज्ञानिकांसाठी प्रेरणा ठरत आहे. स्वीडनमधील गॉटलँड द्वीपवर पाण्याचे संकट दूर करण्यासाठी राळेगण सिद्धीच्या मॉडेलप्रमाणे भूजल रिचार्जिंग परियोजना लागू करण्यात आली आहे. आयव्हीएल स्वीडिश पर्यावरण अनुसंधान संस्थेचे विशेषज्ञ स्टॉफेन फिलिप्सन यांनी सांगितले की, गॉटलँडच्या दक्षिण भागात पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे उत्तरेकडेली भागातून पाण्याची सोय केली गेली व विशेष प्रकारचा जलसंशोधन प्रयोग टेस्ट बडचा वापर करण्यात आला.

बाल्टिक सागरातील पाणी देखील शुद्ध करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र यासाठी खूप उर्जा खर्च होते. अशावेळी आयव्हीएलच्या अन्य सदस्य रूपाली देशमुख यांनी भारतातील गावांमध्ये वापरण्यात येणाऱ्या पारंपारिक पद्धतीचा वापर करण्याचा सल्ला दिला.

फिलिप्सन यांनी सांगितले की, स्ट्रॉसड्रेटची गरज भागवण्यासाठी पाऊस देखील खूप पडतो, मात्र ते पाणी उन्हाळ्यात वापरण्यासाठी साचवणे हेच मोठे आव्हान असते. देशमुख यांनी सांगितले की, स्ट्रॉसड्रेट आणि राळेगण सिद्धीच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये खूप समानता आहे.

फिलिप्सन यांनी सांगितले की, आम्ही राळेगण सिद्धीप्रमाणेच छोटे बंधारे, तलाव आदी परंपरागत जलसाठ्याचे स्त्रोत तयार करत आहोत. याचा स्वीडनमध्ये कधी वापर करण्यात आलेला नाही. भूजल वाढवण्यासाठी देखील नैसर्गिक स्थळे शोधत आहोत व पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाण्यापासून रोखण्यासाठी बांध तयार करत आहोत.

 

Leave a Comment