Video : 2 फूट उंचीच्या वराला मिळाली चक्क 6 फूट उंच सुंदर वधू

नेहमी असे म्हटले जाते की, जोड्या या स्वर्गात बनतता. अनेकदा पाहायला मिळते की, मुलाच्या तुलनेत मुलगी खूपच सुंदर असते, तर कधी मुलीपेक्षा मुलगा सुंदर असतो. सध्या अशाच एका हटके लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, 2 फूटी नवरदेवाला 6 फूट उंचीची सुंदर नवरी मिळाली आहे.

(Source)

पाकिस्तानचे बुरहान चिश्ता, ज्यांची उंची 2 फूट आहे. त्यांचे लग्न 6 फूट उंच फौजिया यांच्याशी झाले आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे हे अरेंज मॅरेज नसून, लव्ह मॅरेज आहे. हे लग्न नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे पार पडले. यावेळी 13 देशांची लोक उपस्थित होती.

(Source)

चिश्तीला लोक प्रेमाने बोबो म्हणतात. त्यांना पोलिओचा आजार आहे व ते लहानपणापासूनच ओस्लो येथे राहतात.

बुहरान चिश्ती यांना 2017 मध्ये मोस्ट इंस्पिरेशनल मॅन हा पुरस्कार देखील मिळाला आहे. फौजिया पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात राहते. पोलिओ झाल्यापासून बुहरान व्हिलचेअरवरच असतात.

बुरहान चिश्ती कोणत्याही सेलिब्रेटीला भेटल्यावर त्यांच्याबरोबरचे फोटो सोशल मीडियावर नक्की शेअर करतात. नॉर्वेमध्ये त्यांनी धुमधडाक्यात विवाह केला. त्यांच्या लग्नातील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Leave a Comment