ब्रिटनच्या लंडनमध्ये मॅजिकल विंटर वंडरलँड पार्क उघडण्यात आले आहे. हे विंटर वंडरलँड पार्क 5 जानेवारीपर्यंत सुरू राहिल. गुरूवारी सायंकाळी 4 वाजता हे पार्क उघडण्यात आले आहे. हे पार्क दररोज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहिल. येथे 350 टन बर्फाने मुर्त्या तयार करण्यात आल्या आहेत. मुर्त्या आकर्षक वाटाव्या यासाठी त्यावर लायटिंग देखील लावण्यात आली आहे.
या पार्कमध्ये 2 आठवड्यात 50 कलाकारांनी तयार केल्या 350 टन बर्फाच्या मुर्त्या

350 टनापासून तयार करण्यात आलेल्या या मुर्त्या जगभरातील 50 कलाकारांनी मिळून तयार केल्या आहेत. पार्कमध्ये यंदाची थीम ख्रिसमसवर आधारित आहे. यामुळे येथे येशू आणि सांताच्या मृत्या बनवण्यात आल्या आहेत.

पार्कचे तापमान मायन्स 10 डिग्री ठेवण्यात आले आहे, जेणेकरून मुर्त्या विरघळणार नाही.
