पर्यावरण जागृकतेसाठी पत्रिकेऐवजी रोपटी देऊन लोकांना दिले लग्नाचे निमंत्रण

पर्यावरणाप्रती लोकांमध्ये जागृकता पसरविण्यासाठी भोपाळमधील एका कुटूंबाने हटके कल्पना वापरली आहे. या कुटूंबाने लग्नाच्या पत्रिकेऐवजी फ्लॉवर पॉटवर वधू-वराचे नाव आणि कार्यक्रम स्थळाचे नाव लिहून 400 लोकांना निमंत्रण पाठवले. यामध्ये अनेक प्रकारची रोपटी देण्यात आली. ही रोपटी 8 महिन्यांपुर्वी लावण्यात आली होती.

भोपाळच्या तुलसी नगर येथील राजकुमार कनकने यांचा मुलगा प्रांशूचा 20 नोव्हेंबरला विवाह होता. सुरूवातीला ते लग्नाची पत्रिका छापणार होते. मात्र मोठा मुलगा प्रतिकच्या सांगण्यावरून त्यांनी लग्नाच्या पत्रिकेत असे काही करावे की, जेणेकरून लोक पर्यावरणाप्रती जागृक होतील, असे काही करण्याचे ठरवले. त्यानंतर या कुटूंबाने वधू-वराचे आणि कार्यक्रमाचे ठिकाण छापलेली रोपटी निमंत्रण म्हणून लोकांना दिली.

लोकांना पत्रिका दिल्यावर ते विसरतात. मात्र घरात ही रोपटी लावून त्यांच्या परिवाराला नेहमी लक्षात ठेवले जाईल. प्रतिकने सांगितले की, आम्ही कार्ड छापले नाहीत. भोपाळमध्येच नातेवाईकांना आणि ओळखीच्या लोकांना 400 फ्लॉवरपॉट देऊन निमंत्रित केले. तर बाहेरील नातेवाईकांना व्हॉट्सअॅपद्वारे निमंत्रित केले. हा प्रयोग खूपच यशस्वी ठरला. लोकांनी याचे खूप कौतूक केले.

 

Leave a Comment