‘अपराजित अयोध्या’ची निर्मिती करणार कंगना


बॉलिवूडची क्विन अर्थात अभिनेत्री कंगना राणावत आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. आता देखील ती अनेक मुद्द्यांवरुन चर्चेत आहे. एकतर तिचे सोशल मीडियावर ‘थलाइवी’ चित्रपटातील लुक्सवरुन व्हायरल होणाऱ्या मीम्सवरुन तर दुसरे कारण म्हणजे अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती कंगना करणार असल्यामुळे. या चित्रपटाचे नाव ‘अपराजित अयोध्या’ असे असणार आहे.

कंगनाच्या निर्मिती संस्थेकडून या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. ‘अपराजित अयोध्या’ हा तिच्या कंपनीकडून निर्मिती होत असलेला पहिलाच चित्रपट असेल. चित्रपटाची निर्मिती अयोध्येतील राम मंदिर आणि खटला या विषयावर केली जाणार आहे. या चित्रपटाच्या शुटिंगला पुढच्या वर्षी सुरुवात होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन बाहुबली सीरीजचे निर्माते के.वी विजयेंद्र प्रसाद करणार आहेत.

अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशीदीचा हा वाद अनेक दशके जुना आहे. अयोध्या प्रकरणाची केवळ नकारात्मक बाजू ८०च्या दशकातील पिढीला माहित होती. भारतीय राजकारणाला या प्रकरणामुळे एक वेगळे वळण मिळाले आणि राजकारणाचा चेहरा बदलला. नुकताच जो निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला त्यामुळे अनेक वर्षे सुरू असलेला वाद सध्या तरी मिटला आहे. हा मुद्दा एका प्रकारे माझ्या खासगी आयुष्यातील प्रवासही दाखवतो. त्यामुळे माझ्या कंपनीकडून निर्मिती होत असलेल्या पहिल्या चित्रपटासाठी यापेक्षा चांगला विषय असू शकत नसल्यामुळे या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतल्याचे कंगनाने म्हटले आहे.

Leave a Comment