पुन्हा एकदा शाहरुखसोबत काम करणार ज्युनिअर बच्चन


खूप काळापासून सिनसृष्टीपासून दूर असलेला ज्युनिअर बच्चन अर्थात अभिषेक बच्चन आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला एका भन्नाट चित्रपटाच्या माध्यमातून येत आहे. याचित्रपटात अभिषेक बच्चन पुन्हा एकदा शाहरुख खानसोबत काम करणार आहे. आगामी बॉब बिस्वास चित्रपटात अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

२०१२मध्ये प्रदर्शित झालेला सुजॉय घोषचा ‘कहानी’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. प्रेक्षकांना एका जागी खिळवून ठेवण्यात ही गुढकथा यशस्वी झाली होती. या चित्रपटातील सर्व पात्रे आजही प्रेक्षकांच्या समोर आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘बॉब बिस्वास’. प्रेक्षकांनी या काल्पनीक पात्राला एवढे डोक्यावर घेतले की सोशल मीडियावर देखील या पात्राची बरीच चर्चा झाली. दिग्दर्शक सुजॉय घोष याच काल्पनिक पात्रावर चित्रपटाची निर्मित करत असून अभिषेक ‘बॉब बिस्वास’च्या भूमिकेत दिसणार आहे.


या चित्रपटाची घोषणा ट्विट करत शाहरुखने केली आहे. या चित्रपटासाठी उत्सुक असल्याचे अभिषेकने देखील म्हटले आहे. या चित्रपटाची निर्मिती सुजय घोषची ‘बाउंड स्क्रिप्ट प्रोडक्शन’ आणि शाहरुखची रेड चिलीज एन्टरटेनमेंट या दोन कंपन्या एकत्र येऊन करणार आहेत. तर अन्नपूर्णा घोष दिग्दर्शकाच्या खुर्चीत असणार आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच २०२० मध्ये या चित्रपटाचे शुटिंग सुरू होणार असून प्रदर्शनाची तारीख अद्यापही सांगण्यात आली नाही.

Leave a Comment