हर्षा भोगलेंचा अपमान करणाऱ्या संजय मांजरेकर नेटकऱ्यांनी झापले


कोलकाता – इडन गार्डन्स मैदानावरील पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारतीय संघाने कोलकात्याच्या बाजी मारली. भारताने टी २० मालिकेत २-१ असा विजय मिळवल्यानंतर कसोटी मालिकेतही २-० असे निर्विवाद वर्चस्व राखत आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले अव्वल स्थान कायम राखले. बांगलादेशवर भारताने १ डाव आणि ४६ धावांनी मात केली. पहिला डाव ३४७ धावांवर घोषित केल्यानंतर बांगलादेशचा दुसरा डाव भारताने १९५ धावांवर संपवला.

भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या डावातही कमाल करून दाखवली. बांगलादेशचा निम्मा संघ उमेश यादवने गारद केला, तर इशांत शर्माने त्याला ४ बळी घेत चांगली साथ दिली. जखमी झाल्यामुळे बांगलादेशचा एक फलंदाज खेळू शकला नाही. अशा परिस्थितीत ९ गडी बाद करत भारताने ऐतिहासिक विजय साकारला. या सामन्यात एक असा प्रसंग घडला की ज्यामुळे नेटिझन्स चांगलेच संतापले. कॉमेंट्री बॉक्समध्ये सामन्याचे समालोचन करणारे अनुभवी हर्षा भोगले आणि माजी क्रिकेटपटू व सध्याचे समालोचक संजय मांजरेकर या दोघांमध्ये मतभेद झाल्याचे दिसले. संजय मांजरेकरने या मतभेदात हर्षा भोगलेचा अपमान केल्याची भावना नेटकऱ्यांमध्ये दिसून आली आणि त्यामुळे संजय मांजरेकरला नेटकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला.

मांजरेकर आणि हर्षा भोगले यांच्यात सामन्यादरम्यान शाब्दिक युद्ध रंगले. गुलाबी चेंडूवरील कसोटीचे योग्य परिक्षण व्हायला हवे. त्या चेंडूवर खेळाडूंना नीटपणे खेळता येत आहे की नाही हे त्यांना विचारायला हवे, असे मत हर्षा भोगलेंनी व्यक्त केले होते. पण संजय मांजरेकरने त्यावर हर्षा भोगलेचे वाक्य अर्ध्यातच तोडत त्वरित उत्तर दिले. तो म्हणाला की याबाबतच्या गोष्टी केवळ तुला विचारायला हव्या. कारण आमच्याकडे क्रिकेट खेळण्याचा पुरेसा अनुभव आहे.

Leave a Comment