अजित पवारांना भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे गाजर – संजय राऊत


मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपकडून अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचे अजित पवार यांना गाजर दिल्याचा गौप्यस्फोट केला आहे. तसेच भाजपचे नेते सत्ता नसेल तर वेडे होतील. कायमच सत्तेचा ते गैरवापर करत आल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले. अद्यापही राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम असून संजय राऊत यांनी त्यावरही भाष्य केले आहे.

दोनच आमदार अजित पवारांसोबत आहेत. दौलत दरोडा, अनिल पाटील या आमदारांना भाजपने गुडगावच्या हॉटेलमध्ये कोंडून ठेवले होते. सत्तेचा भाजप गैरवापर करत आहे. तसेच भाजपकडून मुख्यमंत्रीपदाची अजित पवारांना ऑफर असल्याचे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले. भाजपने सत्तेचा गैरवापर केला असून आता आम्ही भाजपला पुरून उरू असे राऊत म्हणाले.

भाजपपेक्षा आमचे 10 सदस्य विश्वासदर्शक ठरावावेळी जास्त असतील. फडणवीस, अजित पवारांनी बहुमत नसतानाही शपथ घेतली हे गैर आहे. तसेच अजित पवारांना राष्ट्रवादीचे नेते मनवण्याचा प्रयत्न करत असल्याचे संजय राऊत यांना विचारले असता, राज ठाकरेंची मनधरणी करण्यासाठी आम्हीसुद्धा वेळोवेळी त्यांना भेटत असल्याचे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Leave a Comment