राजभवनावर शपथविधीला उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी आमदारांची घरवापसी


मुंबई: राजभवनावर शपथविधीसाठी अजित पवार यांच्या बोलावण्यावरून गेलेले काही आमदार काही तासांतच शरद पवारांच्या आश्रयास आले असून या आमदारांनी कुठलीही कल्पना न देता आम्हाला राजभवनावर बोलावण्यात आले होते. पण, आम्ही पक्षासोबत एकनिष्ठ असल्याचे स्पष्ट केले.

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे राज्यात सरकार येणार असे वाटत असतानाच आज अचानक मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी भाजपने घडवून आणल्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. भाजपच्या या राजकारणामुळे धक्का बसलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची संयुक्त बैठक आज मुंबईत झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. त्याच वेळी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर, बुलडाण्याचे आमदार राजेंद्र शिंगणे, सुनील शेळके यांनी आज सकाळपासूनचा घटनाक्रम सांगितला.

Leave a Comment