या रेस्टोरेंटमध्ये ग्राहक फिश पेडीक्यूर करताना घेतात जेवणाचा आस्वाद

हॉटेलमध्ये जेवण करता करता पाण्यात पाय बुडून मस्त फिश पेडीक्यूर करण्यासारखे अजुन काय चांगले असेल. असेच एक रेस्टोरेंट इंडोनेशियाची सांस्कृतिक राजधानी योग्यकार्ता येथे आहे. या रेस्टोरेंटचे नाव सोटो कोक्रो केम्बँग (Soto Cokro Kembang) असे आहे. या रेस्टोरेंटमध्ये मस्त जेवणाबरोबर फिश पेडीक्यूर करण्याचा दुहेरी आनंद घेता येतो. अनेक ग्राहक खास याच गोष्टीसाठी या ठिकाणी भेट देतात.

या रेस्टोरेंटचा मालक असलेल्या इमाम नूरने जुन महिन्यात नवीन कल्पनेसह हे रेस्टोरेंट सुरू केले. असे हटके हॉटेल सुरू करण्याचे क्रेडिट नूर आपल्या वडिलांना देतो. रेस्टोरेंटमध्ये ग्राहक जेवणाचा आस्वाद घेत असताना 7000 रेड नाइल टलापिया नावाचे मासे अवतीभोवती पाण्यात फिरत असतात.

इमाम नूर सांगतो की, आम्ही हे रेस्टोरेंट येथील जवळपास राहणाऱ्या लोकांसाठी सुरू केले होते. मात्र आम्ही योजना केली होती, त्यापेक्षा वेगळे घडत आहे. आता ही पर्यटकांची आवडती जागा झाली असून, दुसऱ्या शहरातून देखील लोक येथे येतात.

View this post on Instagram

Nyoto nyambi terapi sikil #sotocokrokembang #sleman #yogyakarta

A post shared by Aditya Wibisono (@andreas_aditya_wibisono) on

या रेस्टोरेंटला भेट देणारे ग्राहक आपले फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर करतात.

Leave a Comment