बारामतीत झळकली शरद पवारांच्या समर्थनार्थ पोस्टर्स !


पुणे – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ ऑक्टोबरला लागल्यानंतर राज्याच्या राजकारणात सर्वात मोठी उलथापालथ पहायला मिळाली आहे. सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाने असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. यानंतर राज्यात सत्ता स्थापन करण्याचे शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या ३ पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या मार्फत ठरवले. पण शनिवारी सकाळी या सर्व घडामोडींवर मात करत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीचे बारामतीचे आमदार अजित पवार यांना उप-मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.

राज्यात साहजिकच अजित पवारांनी घेतलेल्या या निर्णयाचे पडसाद पहायला मिळाले. अजित पवारांच्या या निर्णयावर राज्यभरातून प्रतिक्रिया येत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा समर्थनार्थ बारामतीत पोस्टर्स झळकतली आहेत. बारामतीकरांनी आम्ही, ८० वर्षांच्या योद्ध्यासोबत ! असा संदेश लिहत शरद पवार यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी या सर्व प्रकारानंतर अजित पवारांची विधीमंडळ नेते पदावरुन हकालपट्टी केली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर फडणवीस यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी एक आठवड्याच्या कालावधी दिल्यामुळे या काळात राज्याच्या राजकारणात नेमक्या काय घडामोडी घडत आहेत हे पाहणे औसत्युक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment