शपथविधीनंतर ‘या’ ठिकाणी आश्रयास अजित पवार


मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का दिल्यानंतर सकाळी साडे सातच्या सुमारास उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते त्यानंतर नॉट रिचेबल झाले होते. आता मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील नेपियन्सी रोड येथे आपल्या भावाच्या घरी अजित पवार हे आहेत. त्यांचा संपूर्ण परिवारही त्यांच्या सोबत या ठिकाणी उपस्थित आहे.

अजित पवार यांनी शपथ घेतली त्यावेळी राज भवनात पवार यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. यात सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार उपस्थित होते. हे सर्वच्या सर्व नेपियन्सी रोड येथ अजित पवार यांचे जेष्ठ बंधू श्रीनिवास पवार यांच्या घरी आहे. माध्यमांनी अजित पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण माध्यमांना श्रीनिवास पवार यांनी सांगितले की, आता अजित पवार यांना काही बोलायचे नसून ते योग्य वेळी आपली भूमिका मांडणार आहेत.

सध्या नेपियन्सी रोडच्या ब्राइटंट या कॉम्प्लेक्समध्ये अजित पवार यांची गाडी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही तयारी सुरू होती. त्यानुसार आपल्या कुटुंबाला अजित पवार यांनी मुंबईत बोलावून घेतले आहे. या ठिकाणी आता काही कौटुंबिक मित्र अजित पवार यांना भेटायला येत आहेत.

Leave a Comment