3 ते 5 लाखांनी महागणार टोयोटाच्या या कार

टोयोटा आपल्या दोन सर्वात लोकप्रिय कार फॉर्च्युनर आणि इनोव्हा क्रिस्टाचे बीएस6 कम्प्लायंट व्हर्जन लवकरच लाँच करणार आहे. बीएस6 इंजिन अपग्रेडसोबतच दोन्ही गाड्यांच्या किंमतीत 15 ते 20 टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे या दोन्ही गाड्यांच्या किंमतीत 3 ते 5 लाख रुपये वाढ होऊ शकते.

टोयोटा आपल्या दोन गाड्यांच्या इंजिनला नवीन फिल्टर आणि रिवाइज्ड एग्जॉस्ट सिस्टमसोबत अपग्रेड करेल. सध्या टोयोटाच्या फॉर्च्युनरची किंमत 27.83 लाख ते 33.85 लाखांपर्यंत आहे. तर इनोव्हा क्रिस्टाची एक्स शोरुम किंमत 14.93 लाख ते 22.43 लाख रुपयांच्या मध्ये आहे.

बीएस6 एमिशन नॉर्म्स लागू होण्याआधी कंपनी इटियोज रेंजच्या कार बंद होणार आहेत. इटियोस रेंजच्या अंतर्गत इटियोस लिव्हा हॅचबॅक, इटियोस सिडॅन आणि इटियोस क्रॉस कार येतात. कंपनी 1.4 लीटरचे डिझेल इंजिन देखील करणार आहेत.

टोयोटा लवकरच मारूती सुझुकीसोबत मिळून नवीन कार्स तयार करणार आहे. दोन्ही कंपन्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि नवीन सी सेगमेंट एमपीव्ही डेव्हलप करणार आहे.