आता गडकरींची सत्ता स्थापनेबाबतची भविष्यवाणी खरी ठरली


मुंबई: अगदी काल रात्रीपर्यंत राज्यात महा विकास आघाडीचे सरकार येणार, मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार, अशी जोरदार चर्चा सुरु होती आणि अगदी शेवटच्या क्षणी सर्व चित्र बदलले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या सह्यांचे पत्र अजित पवार यांनी देत भाजपला पाठिंबा दिला. त्यानंतर उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देखील त्यांनी घेतल्यामुळे गेले महिनाभर जी चर्चा राज्यात सुरु होती. त्यानुसार, महा विकास आघाडीचे सरकार येणार असेच चित्र स्पष्ट झाले होते. पण शेवटच्या क्षणी नेमकी काय गणिते बदलली हे कुणालाच समजले नाही आणि जो सत्तासंघर्षाचा काही सामना सुरु होता त्यात सध्या तरी भाजपने बाजी मारल्याचे दिसत आहे. पण आता याचवरुन भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे एक वक्तव्य आता खूपच व्हायरल होत आहे.


नितीन गडकरी यांना एका कार्यक्रमात काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात जो काही सत्तास्थापनेचा घोळ सुरु होता त्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. नितीन गडकरी यांनी त्याविषयी बोलताना अतिशय सूचक वक्तव्य केले होते की, शेवटच्या क्षणी क्रिकेटची मॅच आणि राजकारणात काहीही होऊ शकते. बऱ्याचदा असे वाटत होते की, आपण सामना हरतो आहे पण निकाल अगदी उलटा लागतो. नितीन गडकरींच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय होता हे सगळ्यांनाच आता समजल्यामुळे भाजपने आता नेमकी काय खेळी केली हे आता स्पष्ट झाले आहे.

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवारी) सकाळी थेट दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. भाजपने हे सरकार नेमके कुणाच्या पाठिंब्याने स्थापन केले याबाबत यावेळी मात्र साशंकता निर्माण झाली आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत यावेळी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

Leave a Comment