नवीन वर्षात फ्रीज आणि एसी महागणार

1 जानेवारी 2020 पासून ग्राहकांना एसी आणि फ्रीज खरेदी करताना अधिक पैसे द्यावे लागणार आहेत. जानेवारीपासून ब्यूरो ऑफ एनर्जी एफिशियंसी (बीईई) फाइव्ह स्टार रेटिंग देण्यासाठी नवीन मानक लागू करणार आहे. यामुळे कंपन्यांना किंमतीत 6 हजार रुपयांपर्यंत वाढ करावी लागेल.

कंझ्यूमर इलेक्ट्रॉनिक्स अँन्ड एप्लायसेंस मॅन्यूफॅक्चर्स असोसिएशनने (सीईएएमए) म्हटले आहे की, कंपन्यांना फ्रीज आणि एसीमध्ये कूलींगसाठी पारंपारिक फोमच्या ऐवजी वॅक्यूम पॅनेलचा वापर करावा लागेल. उद्योगांसाठी हे एक आव्हान असणार आहे. याशिवाय फ्रोस्ट फ्री आणि डायरेक्ट कूलिंगमध्ये एक स्टारचा देखील बदल असेल.

या तंत्रज्ञानासाठी कंपन्यांना आपल्या फॅक्टीरमध्ये अधिक गुंतवणूक करावी लागेल. मात्र कोणत्याही कंपनीला गुंतवणूक करायची नाही. मात्र असे न केल्यास कंपन्यांना फाइव्ह स्टार रेटिंग मिळणार नाही.

या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीतच एसीच्या विक्रीत 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे आधीपासून सुरू असलेल्या 35 टक्के वाढीपेक्षा अधिक आहे. असोसिएशनने सरकारकडे मागणी केली आहे की, एसीवरील जीएसटी कमी करून 18 टक्के स्लॅबमध्ये आणावी.

Leave a Comment