धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी वाणी कपूरच्या विरोधात तक्रार दाखल


11 नोव्हेंबर रोजी आपल्या इन्स्टाग्रामवर बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरने एक फोटो शेअर केला होता. तिने या फोटोत तंग कपडे घातले होते. तिने परिधान केलेल्या कपड्यांवर ‘हे राम’ नावाची प्रिंट होती. नेटकऱ्यांमध्ये हा फोटो पाहिल्यानंतर संतापाचे वातावरण पसरले असून तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील एन एम जोशी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये वाणीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

यासंदर्भातील वृत्त आजतकने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, रमा सावंत नावाच्या एका महिलेने मुंबईतील एन एम जोशी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये वाणीविरोधात तक्रार दाखल केली. लोकांच्या धार्मिक भावना वाणीने दुखावल्याचा आरोप तिने केला आहे. या तक्रारीनंतर वाणीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. माहितीनुसार, तक्रार दाखल झाल्यानंतर वाणीला पोलिस स्टेशनमध्ये बोलावण्यात आले होते.

वाणी ‘हे राम’ नावाची प्रिंट घातल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाल्यामुळे हा फोटो तिने डिलीटदेखील केला होता. पण तिचा फोटो काही नेटकऱ्यांनी पुन्हा शेअर केला. अनेकांनी धार्मिक भावना दुखावल्याचे म्हणत तिला खडे बोल सुनावले होते.

Leave a Comment