भारताच्या या उपचार पद्धतीवर चीनने देखील ठोकला दावा, घेतली युनेस्कोत धाव

आयुर्वेदप्रमाणेच ‘सोवा रिग्पा’ ही एक उपचार पद्धती आहे. या पद्धतीद्वारे शेकडो वर्षांपासून भारतात उपचार होत आहेत. त्यामुळे ही उपचार पद्धती स्वतःची बनविण्यासाठी भारत युनेस्कोमध्ये पोहचला आहे. चीनने देखील या उपचार पद्धतीवर हक्क दाखवत युनेस्कोमध्ये धाव घेतली आहे. युनेस्कोमध्ये दाखल केलेल्या अर्जात भारताने सोवा रिग्पा ही भारताची वैद्यकिय पद्धत असल्याचे म्हटले आहे. याचा इंटेंजिबल कल्चरल हेरिटेज ऑफ ह्युमॅनिटीच्या सुचीत समावेश करण्यात आले आहे.

चीनच्या दाव्यानंतर भारत युनेस्कोत या उपचार पद्धतीसंबंधी पुरावे व कागदपत्र उपलब्ध करत आहे. जेणकरून यावरील हक्क सांगता येईल. याशिवाय पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या बैठकीत देशात पहिल्यांदाच एक नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ सोवा रिग्पा बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लेहमध्ये बनणाऱ्या या संस्थेसाठी 50 कोटी रुपये खर्च येणार आहे.

सिक्कीम, अरूणाचल प्रदेश, पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग, हिमाचलमधील धर्मशाला याशिवाय लद्दाख या भागांमध्ये सोवा रिग्पा उपचार पद्धत प्रसिद्ध आहे. विशेषज्ञांचा दावा आहे की, याद्वारे अस्थमा, कर्करोग, आर्थराइटिस इत्यादी गंभीर आजारांवर उपचार केला जावू शकतो.

Leave a Comment