राज्यातील महाविकासआघाडीला समाजवादीचा पाठिंबा


मुंबई – शिवसेनेसोबत राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटकपक्षांनी हिरवा कंदील दिला आहे. आता शिवसेनेला काँग्रेस आघाडीचा घटकपक्ष समाजवादी पक्षानेही आपला पाठिंबा जाहीर केला आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी दुश्मन का दुश्मन दोस्त होता है, अशी संवादफेक करत सपाचा सेनेला पाठिंबा असेल असे म्हटले आहे. सर्वच घटक पक्ष आजच्या बैठकीत राजी झाले असल्याचे ते म्हणाले.

किमान समान कार्यक्रमावर सध्या काम सुरु आहे. आम्ही त्यात आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मांडल्या आहेत. महाराष्ट्रातील सरकार हे समाजातील सर्व घटकांसाठी असावे. सांप्रदायिकता संपुष्टात आली पाहिजे. ही आघाडी विकासासाठी झाली आहे. आमची मुस्लिम आरक्षणाची मागणी आहे. समाजवादी पार्टी शेतकऱ्यांबरोबर आहे.

शिवसेनेला पाठिंबा हवा असेल तर त्यांनी त्यांच्या नितीत बदल करावा, असेही त्यांनी म्हटले. मित्रपक्षांची सहमती झाली आहे. आतापर्यंत समोरासमोर बैठक झाली नव्हती. आता त्याची सुरुवात झाली आहे. आज दुपारी उद्धव ठाकरे यांच्याशी बैठक होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment