अनधिकृत पार्किंगची माहिती द्या आणि बक्षीस जिंका !


नवी दिल्ली – केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच अनधिकृतपणे पार्क केलेल्या गाड्यांची माहिती देणाऱ्या लोकांना पैसे कमवता येणार आहेत. यासाठीचा नवा कायदा अंमलात आणणार आहे. या नव्या कायद्यानुसार, अनधिकृतरित्या पार्क केलेल्या गाडीमालकाकडून वसूल केल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेतील काही भाग हा तक्रारदाराला बक्षीस देण्यात येणार आहे.

हा कायदा येत्या वर्षभरात आणला जाईल. त्याआधी, पुरेशी पार्किंग व्यवस्था तयार करण्यासाठी सर्व राज्यांना वेळ देण्यात येणार आहे. त्यानंतर अशा अनधिकृतपणे पार्क केलेल्या गाड्यांची छायाचित्रे नागरिक संबंधित प्रशासनाला पाठवून बक्षीस मिळवू शकतील, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

पार्किंगची समस्या ही वेगाने विकसित होणाऱ्या शहरांसाठी गंभीर झाली असल्यामुळे, सरकारी कार्यालये, हॉटेल्स आणि इतर सार्वजनिक ठिकाणी अनेक मजली पार्किंग व्यवस्था उपलब्ध असणे ही एक गरज बनली असल्याचे गडकरी पुढे म्हणाले. त्याचबरोबर, दिल्लीतील सर्व गोडाऊन हे दिल्ली सरकारने शहराबाहेर हलवण्यास सांगितले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Leave a Comment