लवकरच दाखल होणार ऑडीची सिंगल चार्जमध्ये 446 किमी धावणारी इलेक्ट्रिक कार

ऑडी आपली इलेक्ट्रिक कार ई-ट्रॉनचे दुसरे स्पोर्टबॅक व्हेरिएंट लवकरच लाँच करणार आहे. या व्हर्जनला 2020 च्या दुसऱ्या तिमाहीत युरोपमध्ये लाँच केले जाईल. या इलेक्ट्रिक कारच्या टॉप व्हर्जनमध्ये ड्युअल इलेक्ट्रिक मोटर सपोर्ट मिळेल.

या कारची अंदाजे किंमत 56.66 लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. कंपनीने दावा केला आहे की, सिंगल चार्जमध्ये ही कार 446 किमी अंतर पार करते. कारची टॉप स्पीड ताशी 200 किमी आहे. ऑडीच्या या कारचे स्पोर्टबॅक व्हर्जन पाच मीटर लांब आहे. या एसयूव्हीमध्ये 5 लोकांना बसण्याची जागा आहे.

(Source)

यामध्ये देण्यात आलेल्या इलेक्ट्रिक मोटरद्वारे 265 किलोवॉटने 350 हॉर्स पॉवर जनरेट होते. केवळ 6.8 सेंकदात ही कार ताशी 0 ते 100 किमीचा वेग पकडते.

(Source)

या कारमध्ये 12.3 इंच डिजिटल इंस्ट्रुमेंट कलस्टर असेल, जे स्टेअरिंग व्हिलच्या मागे असेल. तर मुख्य डॅशबोर्डला 12.1 इंच टचस्क्रीन आणि आणखी एक 8.6 इंच टचस्क्रीनमध्ये क्लायमेट कंट्रोलची माहिती मिळेल.

Leave a Comment