अनु मलिक यांना पुन्हा एकदा सोडावे लागले ‘इंडियन आयडॉल’चे परीक्षक पद


मागच्या वर्षी गायिका सोना मोहापात्राने #MeToo च्या मोहिमेच्या माध्यमातून संगीतकार अनु मलिक यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप लावले होते. अनु मलिक हे तेव्हापासून चर्चेत आहेत. आता सोनाने पुन्हा एकदा त्यांच्यावर टीका केली. असल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा इंडियन आयडॉलचे परीक्षक पद सोडावे लागले.


इंडियन आयडॉलच्या अकराव्या पर्वाचे अनु मलिक हे परीक्षक म्हणून काम पाहत होते. गायिका नेहा कक्कर आणि विशाल दादलानी हे देखील त्यांच्यासोबत परीक्षकाची भूमिका पार पाडत आहेत. पण, मागच्या वर्षीपासून #MeeToo मध्ये अनु मलिक यांचे नाव अडकल्यामुळे त्यांना मागच्या वर्षीदेखील या पदावरुन पायउतार व्हावे लागले होते. त्यांना यावेळी पुन्हा एकदा परीक्षकाची जबाबदारी देण्यात आली होती. पण, त्यांच्यावर सोनाने पुन्हा टीका केल्यामुळे त्यांनी हे पद सोडले आहे.

अनु मलिक यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काही दिवसांपर्वी एका पोस्टद्वारे त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळले होते. पण, अनु मलिक यांच्यावर सोनासोबतच नेहा भसीन आणि श्वेता पंडित यांसारख्या गायिकांनीही आरोप केल्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगानेही याबाबतची दखल घेतली आहे.

Leave a Comment