गुगलचा हा स्मार्टफोन हॅक केल्यास मिळणार ११ कोटी रुपयांचे बक्षीस


नवी दिल्लीः गुगलने आपल्या ब्लॉगवर गुगलचा स्मार्टफोन पिक्सल हॅक करणाऱ्यास गुगल १० कोटी ७६ लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याचे म्हटले आहे. सध्या टायटन एम (Titan M) चीप गुगल पिक्सलमध्ये बसवण्यात आली आहे. ही चीप अत्यंत सुरक्षित अशी समजली जाते. एखाद्या व्यक्तीने जर हा फोन हॅक करून दाखवला तर त्या व्यक्तिला गुगलकडून तब्बल १.५ मिलियन डॉलर म्हणजेच १० कोटी ७६ लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत.

स्मार्टफोनमधील सर्वांना सुरक्षा देण्याचे काम टायटन एम (Titan M) ही चीप करते. ही चीप सध्या सर्वात सुरक्षित समजली जाते. बील्ट इन सिक्युरिटी फोनमध्ये देण्यासाठी टायटन एमला सर्वात जास्त रेटिंग देण्यात आली आहे. यावर आम्ही जाणीवपूर्वक बक्षीस ठेवले आहे. या फोनमध्ये काही तरी कमतरता संशोधकांनी शोधावी हा या मागचा उद्देश असल्याने हे बक्षीस आम्ही ठेवले आहे, असे गुगल कंपनीने स्पष्ट केले आहे. संशोधकांनी या फोनमध्ये जर काही कमी शोधल्यास त्याला बक्षीस देऊन आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वात चांगली सेवा देऊ, असेही कंपनीने म्हटले आहे. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी हे सर्व करत असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अँड्रॉईड व्हर्जन हॅक करणाऱ्यावरही गुगलने बक्षीस ठेवले आहे. अँड्रॉईडसाठी काही खास प्रीव्ह्यू व्हर्जनसाठी आम्ही एक स्पेशल प्रोग्राम लाँच करत आहोत. काही कमतरता यात शोधल्यास ५० टक्के रक्कम बोनस म्हणून दिली जाणार असल्याचे गुगल कंपनीने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत १८०० रिपोर्ट्सला गुगलने बक्षीस दिले आहे. कंपनीने तब्बल ४ मिलियन डॉलर चार वर्षात बक्षीस म्हणून दिले आहे. कंपनीने गेल्या १२ महिन्यात गुगलच्या सिस्टममध्ये कमी शोधणाऱ्यास १.५ मिलियन डॉलर म्हणजेच ११ कोटींच्या आसपास बक्षीस म्हणून दिले आहेत.

Leave a Comment