मर्सिडिजची बहुप्रतिक्षित ‘मेबॅक जीएलएस 600’ लग्झरी एसयूव्ही लाँच

लग्झरी कार कंपनी मर्सिडिजने बहुप्रतिक्षित मर्सिडिज मेबॅक जीएलएस 600 वरील पडदा हटवला आहे. मर्सिडिजची कार बेन्टली बेन्टायगा, रॉल्स रॉयस क्युलिअनला टक्कर देईल. ही लग्झरी एसयूव्ही 4 आणि 5 सीटर पर्यायामध्ये उपलब्ध आहे. याशिवाय यामध्ये 4.0 लीटर व्ही8 इंजिन देण्यात आलेले आहे. जे 542 बीएचपी पॉवर आणि 730 एनएम टॉर्क जनरेट करते. याशिवाय यात 9जी ट्रोनिक ऑटोमेटिक ट्रांसमिशन देण्यात आलेले आहे.मर्सिडिज मेबॅक जीएलएस 600 वर्ष 2020 च्या वर्षअखेरपर्यंत जागतिक बाजारात दाखल होईल.

(Source)

लूकमध्ये ही लग्झरी एसयूव्ही शानदार आहे. समोरील बाजूस क्रोम ग्रिल, एलईडी हँडलॅम्पस देण्यात आले आहेत. याशिवाय यात 23 इंच मल्टी स्पोक व्हिल्स देखील मिळतील.

(Source)

या लग्झरी कारचे प्रमुख आकर्षण याचे कॅबिन आहे. यामध्ये भरपूर जागा देण्यात आलेली आहे. डॅशबोर्ड नापा लेदरचे आहे. 4 सीटर व्हर्जनमध्ये फिक्स्ड सेंटर कन्सोल, फोल्डिंग टेबल्ससोबतच रेफ्रिजरेटरसाठी देखील जागा मिळेल.

मर्सिडिज मेबॅक जीएलएस 600 मध्ये इंस्ट्रुमेंट क्लस्टर आणि मीडिया डिस्प्ले असे दोन 12.3 इंच स्क्रिन देण्यात आलेले आहेत. जे MBUX इंफोटेन्मेंट सिस्टिने सुसज्ज आहेत.  प्रवास आरामदायी व्हावा यासाठी यात एअरमेटिक एअर सस्पेंशन सिस्टम देण्यात आलेली आहे.

Leave a Comment