टेस्लाचा बुलेटप्रुफ, इलेक्ट्रिक ‘सायबर’ ट्रक लाँच

आपल्या हटके कारमुळे प्रसिद्ध असलेल्या टेस्ला कंपनीने आपल्या बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक पिकअप ट्रकवरील पडदा हटवला आहे. कॅलिफोर्निया येथील इव्हेंटमध्ये इलेक्ट्रिक सायबर ट्रक लाँच करण्यात आला. प्रथमक्षणी पाहताना हा ट्रक न वाटता, ट्रकच्या आकाराची एखादी कलाकृतीच वाटते.

कंपनीचे सीईओ एलॉन मस्क यांनी दावा केला आहे की, ट्रकसाठी स्पेस एक्स रॉकेटसाठी वापरण्यात आलेल्या स्टेनलेस स्टील एलॉयचा वापर करण्यात आला आहे. हा ट्रक बुलेटप्रुफ आहे.

या ट्रकचे सर्वात महागडे व्हर्जन जवळपास 1600 किलो वजन वाहून नेवू शकते. तर 6530 किलो ओढून नेवू शकतो. हा ट्रक केवळ 2.9 सेंकदामध्ये ताशी 0 ते 60 किमीचा वेग पकडू शकतो. सिंगल चार्जमध्ये हा ट्रक 800 किमी धावू शकतो. तर या इलेक्ट्रिक ट्रकचे सुरूवातीचे मॉडेल सिंगल चार्जमध्ये 400 किमी चालते.

(Source)

इलेक्ट्रिक ट्रकच्या बेस व्हर्जनची (400 किमी) किंमत ही जवळपास 28 लाख रुपये आहे. तर सर्वात टॉप व्हर्जन सायबर ट्रकची किंमत जवळपास 50 लाख रुपये आहे. सेल्फ ड्रायव्हिंग मोड या पर्यायामध्ये देखील हा सायबर ट्रक उपलब्ध आहे. मात्र त्यासाठी जवळपास 5 लाख रुपये अतिरिक्त द्यावे लागतील.

याशिवाय या सायबर ट्रकचे खास फीचर म्हणजे याची उंची देखील वाढवता येते. 2021 मध्ये सायबरट्रकचे उत्पादन सुरू करण्यात येणार आहे.

Leave a Comment