या महिलेचा आवाज ऐकून तुम्ही रानू मंडल यांना विसराल


रेल्वे स्टेशनवर गाणे गात असलेला रानु मंडल यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एक रात्रीतच त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलले. त्यांना बॉलीवूडचा प्रसिद्ध संगीतकार, गायक हिमेश रेशमिया याने आपल्या आगामी चित्रपटात गाण्याची संधी दिली. अशा प्रकारे रेल्वे प्लॅटफॉर्मवर राहणाऱ्या रानू मंडल या बघता बघता स्टारही बनल्या. पण सध्याच्या घडीला सोशल मीडियावर एका नवीन महिलेचा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे.


सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे, तिचा आवाज ऐकल्यानंतर तुम्हाला रानू मंडल यांचा नक्कीच विसर पडेल. हा व्हिडिओ सुबोध घिलडीयाल नावाच्या एका ट्विटर युझरने शेअर केला असून त्याने हा व्हिडिओ शेअर करताना प्रश्न विचारला की, कोणी शोधू शकेल का या सुरेल आवाजाच्या महिलेला? त्यावर लगेचच अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त तर केल्या आहेतच पण त्याही सोबत या महिलेच्या आवाजाचे कौतुकही केले आहे.

आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसते की ‘ताज महाल’ या चित्रपटातील ‘जो वादा किया वो…’ हे प्रसिद्ध गाणे एक महिला गात आहे. विशेष म्हणजे अनेक नेटकऱ्यांनी रानू मंडलपेक्षाही उत्तम ही महिला गात असल्याचे मत अनेक नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे. परंतु ही महिला कोण आहे? कुठे राहते आणि काय करते हे अद्यापही मिळालेली नाही. पण एवढे मात्र निश्चित होत आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून स्थानिक टॅलेंट समोर येत आहे आणि कलेचा वारसा असूनही कधीही प्रसिद्धी न मिळालेले लोक आता या माध्यमातून लोकांसमोर येत आहेत.

Leave a Comment