शाओमीचे हे फीचर देणार भूकंपाची पूर्वसुचना

चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीने बिजिंग येथे झालेल्या कॉन्फ्रेंसमध्ये सर्व स्मार्टफोनच्या फीचर्ससाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. कंपनीने युजर्स आणि त्यांच्या परिवाराच्या सुरक्षेला लक्षात घेऊन अर्थक्वेक (भूकंप) फीचर आणले आहे. हे फीचर चीनमधील युजर्सला लेटेस्ट एमआययूआय 11 ऑपरेटिंग सिस्टममध्ये मिळेल. कंपनी लवकरच हे फीचर चीनच्या इतर भागांमध्ये देखील टेस्ट करणार आहे. याशिवाय हे भूकंपाची माहिती देणारे फीचर शाओमी स्मार्ट टिव्हीमध्ये देखील सपोर्ट करेल. अद्याप या फीचरला भारतात कधी लाँच करणार याची माहिती कंपनीने दिलेली नाही.

हे फीचर भूकंपाच्या आधी 10 सेंकद युजर्सला अलर्ट करेल. त्यामुळे युजर्स भूकंपाच्या आधी सुरक्षित ठिकाणी पोहचू शकेल. यासोबतच या फीचरमध्ये इमर्जेन्सी शेल्टर, कॉन्टॅक्ट डीटेल, मेडिकल कॉन्टॅक्ट आणि रेसक्यू याची माहिती देखील मिळेल.

सध्या हे फीचर शाओमीने केवळ चीनमध्ये लाँच केले आहे. मात्र कंपनी लवकरच काही ठराविक संस्थेबरोबर मिळून इतर देशात देखील हे फीचर लाँच करणार आहे.

 

Leave a Comment