राष्ट्रवादी २०१४ प्रमाणेच भाजपचे बाहेरुन समर्थन करतील – आठवले


नवी दिल्ली – पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेमध्ये युती होईल असे केंद्रीय राज्यमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल बैठक पार पडली. आठवले यांनी हे वक्तव्य त्यावर प्रतिक्रिया देताना केले.

या भेटीबाबत शरद पवार म्हणाले होते, की कोणतीही राजकीय चर्चा मोदींसह त्यांनी केली नाही. पण, ते एक उत्तम राजकारणी आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जेव्हा त्यांच्या पाठिंब्याची भाजपला गरज नव्हती, त्यांनी तेव्हा भाजपला पाठिंबा दिला होता. आता त्यांच्या पाठिंब्याची गरज भाजपला आहे, तेव्हा कदाचित पुन्हा एकदा ते भाजपला पाठिंबा देतील, असे आठवले यांनी म्हटले आहे.

जी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये होऊ घातलेली युती आहे, ती जास्त काळ टिकणार नाही. पवार कदाचित २०१४ प्रमाणेच भाजपचे बाहेरून समर्थन करतील करतील, असेही आठवले म्हणाले. तुम्ही अजूनही शिवसेना-भाजप युतीसाठी प्रयत्न करत आहात का? या प्रश्नाला उत्तर देत ते म्हणाले, की तसा प्रयत्न मी सततपणे करत होतो. पण, त्याचे काही परिणाम दिसत नव्हते. मुख्यमंत्रीपदावर अडून बसलेली शिवसेना ऐकण्याच्या तयारीत नाही दिसत आहे. तरीही, मी त्यासाठी प्रयत्न करत राहील.

Leave a Comment