पहिल्यांदाच मराठी भावगीत गाणार पंकज उधास


आपल्या ३० वर्षांच्या कारर्किदीत प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास हे पहिल्यांदाच मराठी भावगीत गाणार आहे. ते ‘रंग धनुचा झुला’ हे गाणे कविता पौडवाल यांच्यासोबत गाणार आहे. ते पहिल्यांदाच या गाण्याद्वारे मराठी संगीत विश्वात पाऊल ठेवत असल्यामुळे पंकज यांचे मराठी रसिक श्रोते खूपच उत्सुक आहेत.

या गाण्याला ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की संगीत देणार आहेत तर गाण्याचे बोल मंदा चोळकर यांनी लिहिले आहेत. मी माझ्या तीस वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच मराठीत गाणे गाणार आहे. मुंबईत मी एवढी वर्षे राहिलो आहे पण मराठीतून गाण्याचा योग पहिल्यांदाच जुळून आला. अशोक पत्की आणि कविता पौडवाल यांच्यासोबत काम करताना आनंद होत आहे. हे गीत मराठी श्रोत्यांच्या हृदयाला भावेल, असे पंकज उधास म्हणाले. प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या कविता पौडवाल या कन्या असून ८० आणि ९० च्या दशकातील चित्रपटात पंकज उधास यांनी अनेक गझल गायल्या आहेत.

Leave a Comment