व्हायरल, या मराठमोळ्या मॉडेलने ओलांडल्या सर्व सीमा


सध्या सोशल मीडियावर सध्या एका मराठमोळ्या अभिनेत्री-मॉडेलने धुमाकुळ घातला आहे. या अभिनेत्रीचे न्यूड फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अभिनेत्री-मॉडेलचे नाव निकिता गोखले असे असून तिच्या फोटोमुळे अनेकांची दांडी गूल झाली आहे.

ज्याप्रकारचे बोल्ड फोटोशूट निकिताने केले आहे तशाप्रकारचे फोटोशूट आजवर कोणत्याही मराठी अभिनेत्री अथवा मॉडेलने क्वचितच केले असावे. सोशल मीडियावर निकिता गोखलेचा बोल्ड अंदाज तिच्या चाहत्यांसह अनेकांना भलताच आवडला असून, तिचे फोटो अनेकांनी शेअर केले आहेत. तर तिच्या फोटोखाली अनेकांनी लाईक्स आणि प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. काहींनी मात्र निकिताचा हा अंदाज आवडला नसल्याचे सांगत नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.


आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे सर्व फोटो निकिता गोखले हिने शेअर केले आहेत. निकिता गोखले हिच्या बोल्डनेसचा अंदाज केवळ तिचे फोटो पाहूनच येतो. आपले असे डझनभर फोटो इन्स्टाग्रामवर तिने शेअर केले आहेत. तिने या आधीही आपल्या चाहत्यांसाठी आपली अनेक मादक आणि घायाळ करणारे फोटो सोशल मीडियावर वेळोवेळी शेअर केले आहेत.


सोशल मीडियावर निकिता गोखले भलतीच लोकप्रिय आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून, ती सातत्याने आपले बोल्ड फोटो अपलोड करुन चाहत्यांना क्लिन बोल्ड करत असते.


जानेवारी 2019 मध्ये निकिता गोखले हिने केलेल्या फोटोशुटमुळे ती पहिल्यांदा चर्चेत आली होती. सोशल मीडियावर ती तेव्हापासून आपले फोटो शेअर करत आहे. जानेवारी 2019 मध्येही हॉट फोटोशूट हेच तिच्या चर्चेत येण्याचे कारण होते.


29 वर्षीय निकिता गोखले हिचा जन्म 2 एप्रिल 1990 या दिवशी भंडारा जिल्ह्यातील तुमसर गावात झाला. ती करिअरच्या वाटा धुंडाळत वयाच्या 17 व्या वर्षी नागपूरला आली. मॉडेल, अभिनय आणि आर्थिक सल्लागार आदी क्षेत्रात ती कार्यरत आहे.


नागपूर शहरातीलच एका महाविद्यालयातून निकिता हिने आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने मॉडेलिंग, अभिनय आणि आर्थिक सल्लागार या क्षेत्रात पाऊल टाकले. तिने 2015 मध्ये रिलीज झालेल्या कॉलेज या मराठी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले.

Leave a Comment